मुंबई |नगर सहयाद्री मराठी इंडस्ट्रीत दमदार व्यक्तिमत्व आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्राजक...
मुंबई |नगर सहयाद्री
मराठी इंडस्ट्रीत दमदार व्यक्तिमत्व आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता माळीने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये अभिनय सादर केले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनयासाठी खास ओळखली जाते.
तसेच ती तिच्या मराठमोळ्या लूकसाठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ताचा फिटनेस रूटीनदेखील सोशल मीडियावर चर्चेत असल्यामुळे ती चाहत्यांना फिटनेसच्या स्मार्ट टिप्स देत असते. प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमध्ये काम केल्यानंतर तिला खरी ओळख मिळाली. या मालिकेमध्ये प्राजक्ताने नायिकेची भूमिका साकार केली होती. तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकर हा प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला होता. या मालिकेनंतर प्राजक्ताने तिच्या फीटनेसवर अधिक भर दिला.
वजन कमी करण्याबरोबरच प्राजक्ताने तिचे डेली रूटीन ठरवले. फिटनेससाठी तिने डाएटविषयीची वेगवेगळे पुस्तके वाचली. पुस्तकांमधूनच ती योगसाठी प्रोत्साहित होऊन व्यायामाची पारंपारिक शैली आत्मसात करण्यास सुरुवात केली. यावेळी प्राजक्ताने आहार आणि योगा दोन्ही गोष्टींना समान महत्व दिले. एका मुलाखती दरम्यान प्राजक्ता म्हणाली, अष्टांग योगा केल्याने चेहर्याची स्किन, शरीर फिट राहते, मनाला आणि शरीराला अंतर्बाह्य संतुलित करणे हे सगळं साध्य होऊ शकतं.
अष्टांग योगा हा शरीरातल्या सगळ्या अवयवांना योग्य वळण देणारा एक उत्तम व्यायाम आहे. व्यायामाबरोबरच आहार देखील तितकाच महत्वाचा असतो. व्यायाम आणि आहार व्यवस्थित असेल तर आरोग्य निरोगी राहते. तसेच आपली त्वचा आणि केसदेखील चांगले राहतात असे मुलाखतीवेळी प्राजक्ता म्हणाली.
COMMENTS