आमदार नीलेश लंके | स्वच्छ भारत अभियानांतर्गत ट्रॅक्टरचे लोकार्पण पारनेर | नगर सह्याद्री पारनेर शहराच्या जिव्हाळयाच्या पाणी योजनेची फाईल ...
आमदार नीलेश लंके | स्वच्छ भारत अभियानांतर्गत ट्रॅक्टरचे लोकार्पण
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहराच्या जिव्हाळयाच्या पाणी योजनेची फाईल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच ही योजना मंजुर होईल. ७३ कोटी रूपये खर्चाची ही योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. या योजनेचा पाठपुरावा करून आपण ही योजना मंजुरीच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे. इतर योजनांसाठी निधी उपलब्ध करण्याचे आपले प्रयत्न असून निधीच्या बाबतीत आपण कोठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही आ. लंके यांनी यावेळी दिली.
शासनाच्या वतीने पारनेर नगरपंचायतीस स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ ट्रॅक्टर मिळाले असून आमदार नीलेश लंकेंनी ट्रॅकटरचे सारथ्य करत लोकार्पण सोहळा संपन्न केला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पारनेर नगरपंचायतीस मिळालेल्या दोन ट्रॅक्टरचे शुक्रवारी आ. नीलेश लंके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. लंके म्हणाले, शासनाकडून स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध होत असून विविध यांत्रीक उपकरणेही देण्यात येत आहेत. नगरपंचायतीच्या पदाधिकारी तसेच कर्मचार्यांनी या निधीचा योग्य विनियोग करून आपले शहर स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर कसे राहिल याची काळजी घेतली पाहिजे.
नगर विकास खात्याकडून नगरपंचायत हद्दीमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी आपण अलिकडेच ५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सेनापती बापट स्मारकाच्या नुतनीकरणासाठी सुमारे ९ कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून पुरातत्व विभागाने त्यासाठी एजन्सीचीही नियुक्ती केली आहे.
यावेळी नगराध्यक्ष नितीन आडसूळ, उपनगराध्यक्षा जायदा शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगरसेवक योगेश मते, अशोक चेडे, डॉ. विद्या कावरे, प्रियंका औटी, भूषण शेलार, सुप्रिया शिंदे, निता औटी, हिमानी नगरे, निता ठुबे, शुभम देशमुख, डॉ. सादीक राजे यांच्यासह पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, शिक्षक नेते रा. या. औटी, संजय वाघमारे, बबन शेख, राजू शेख, विजय डोळ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष वैभव गायकवाड यांच्यासह शहरातील नागरीक, नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS