कुकाणे। नगर सहयाद्री- कुकाण्यातील एका तरुणाने दोन समाजात तेढ निर्माण करणारी कॉमेंट केली. अंकुश साहेबराव इटकर, (रा. जेऊर हैबत्ती ता. नेवासे )...
कुकाणे। नगर सहयाद्री-
कुकाण्यातील एका तरुणाने दोन समाजात तेढ निर्माण करणारी कॉमेंट केली. अंकुश साहेबराव इटकर, (रा. जेऊर हैबत्ती ता. नेवासे ) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तासाभरातच आरोपी अर्शद मन्सुरी, ( रा. कुकाणे )यास श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी काही संघटनानीआज ( रविवारी ) या प्रकाराच्या निषेधार्थ कुकाणे बंदचे आवाहन केले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, धार्मिक भावना दुखावणारी व दोन समाजात तेढ निर्माण करणारी कॉमेंट कुकाण्यातील एकास महागात पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केल्याचे या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
रविवारी या प्रकाराच्या निषेधार्थ कुकाणे बंदचे आवाहन केले आहे. अंकुश साहेबराव इटकर, (रा. जेऊर हैबत्ती ता. नेवासे ) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तासाभरातच अर्शद मन्सुरी, ( रा. कुकाणे ) यास श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले.
COMMENTS