वाद विकोपाला गेल्याने आरोपीने बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मोहम्मद अझहर मोहम्मद अजीज यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.
शहरातील डी मार्ट परिसरात एका फळ विक्रेत्याचा कोयत्याने हात छाटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेला प्रकार बुधवारी दुपारी ४ च्या दरम्यान घडला. माझ्याकडे पाहून का हसतोस या क्षुल्लक कारणावरून फळ विक्रेत्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे.
मोहम्मद अझहर मोहम्मद अजीज असे जखमी फळ विक्रेत्याचे नाव असून शहरामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अझहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. ते डी मार्ट परिसरात विक्रीसाठी गेले असता शेजारी असणाऱ्या फळ विक्रेत्यासोबत त्याचा वाद झाला.
वाद विकोपाला गेल्याने आरोपीने बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मोहम्मद अझहर मोहम्मद अजीज यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. मोहम्मद अझहर हे जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील घेत आहेत.
COMMENTS