Loksabha Election : आताच्या घडीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आली आहे. केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरला संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. ...
Loksabha Election : आताच्या घडीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आली आहे. केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरला संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. अचानक हे विशेष अधिवेशन बोलावल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या विरोधी पक्ष एकत्र येत भाजपला रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सर्वांचे लक्ष हे विरोधकांच्या प्लॅनिंगकडे लागलेले आहे. भाजपला याचा तोटा होईल , लोकसभेला कमी जागा येतील असे अंदाज समोर येऊ लागले असतानाच आता या अचानक अधिवेशन बोलावलं असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या अधिवेशनात अतिशय महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे देशात सर्व निवडणुका या आगामी डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. केंद्र सरकार या विशेष अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’ याबाबतचं विधेयक मांडू शकतं असाही म्हटलं जात आहे.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विशेष अधिवेशनाबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाआधीच हे पाच दिवसांचं स्पेशल अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे या अधिवेशनाला जास्त महत्त्व प्राप्त झाल आहे.
पाच दिवसांच्या अधिवेशनात सहा विधेयक मांडली जाणार?
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2014 मध्ये सत्ता आल्यानंतर एक देश एक निवडणूक याबाबतची चर्चा समोर आली होती. त्यानंतर वारंवार याबाबत चर्चा होत राहिल्या. एक देश एक निवडणूकसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे याचबाबतचा अध्यादेश सरकार आणण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात 6 विधेयक मांडली जाणार आहेत. तसेच सात ते आठ बैठका होणार आहेत.
COMMENTS