श्रीगोंदा | नगर सह्याद्री विसापूर आणि घोडचे आवर्तन तात्काळ सोडावे या मागणीसाठी नगर दौंड महामार्गावर बेलवडी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
विसापूर आणि घोडचे आवर्तन तात्काळ सोडावे या मागणीसाठी नगर दौंड महामार्गावर बेलवडी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. लोकप्रतीनिधी पाण्याचं राजकरण करीत आहेत, आमचं हक्काचं पाणी सोडा, जर पाणी सोडले नाही तर गेट तोडो आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला.
विसापूर आणि घोडचे आवर्तन फळबागा जगविण्यासाठी तात्काळ सोडावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्वाखाली बेलवडी फाटा येथे नगर दौंड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी जगताप बोलत होते.
यावेळी जगताप म्हणाले की, घोड आणि कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकर्यांची वेळेवर पाणी सोडले नाही आणि पाऊस ही झाला नाही त्यामुळे फळबाग व ऊस, कापूस, बाजरी यासह पिके धोक्यात आली आहेत तरी देखील तालुक्याच्या लोकप्रतीधिनी घरात बसून पाण्याचं राजकारण करीत आहे. राजकारण, राजकारणाच्या वेळी करा पण शेतकर्यांचे नुकसान होऊ नये या साठी पाणी सोडा, आमचं पाणी आम्हाला द्या. अन्यथा आम्ही मंगळवारी गेट तोडो आंदोलन करणार असल्याचा या वेळी इशारा जगताप यांनी प्रशासनाला दिला.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शेलार म्हणाले की, बेलवंडी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यामुळे पोलीस ठाण्याचा गौरव पोलीस अधिक्षक यांनी केला. ठेंगे यांनी अनेक चोर पकडले असून त्यांनी विसापूरचे पाणी चोरणारा चोर पकडून द्यावा. नको तिथं ओढ्याला पाणी, काही खाजगी तलावात पाणी, मांगी, चौंडी येथील धरणात पाणी सोडले जाते मग आमच्या विसापूर धरणात पाणी सोडायला काय अडचण आहे. कुकडीचे अभियंता हे जाणुन बुजून विसापूर धरणांत पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत आहेत. सोमवार पर्यंत विसपूरचे पाणी सोडले नाही तर मंगळवारी सर्व शेतकरी आपल्या जनावरांसह, बायका मुलांसह रस्त्यावर उतरतील अशी आक्रमक भूमिका शेलार यांनी घेतली.
यावेळी माजी आमदार राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा यांनी शेतकर्यांच्या वतीने उपविभागीय अभियंता वाळके, तहसीलदार सुषमा रेडके, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. याप्रसंगी बेलवडी चे सरपंच ऋषिकेश शेलार, संजय डाके, गोरख जठार, मुरलीधर ढवळे, सुभाष काळाने, विलासराव राजेभोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
COMMENTS