सुपा ग्रामपंचायतीच्या वतीने वीर जवानांचा सन्मान सुपा | नगर सह्याद्री सैनिक हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून देश सेवा करत असतात, ते सिमेवर अस...
सुपा ग्रामपंचायतीच्या वतीने वीर जवानांचा सन्मान
सुपा | नगर सह्याद्री
सैनिक हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून देश सेवा करत असतात, ते सिमेवर असताना शत्रूशी दोन हात करतात. त्यामुळे देशाला राज्याला तसेच जिल्हा तालुका आपले गाव हे सुरक्षित रहाते. सैनिक देशसेवा करत असताना त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटा प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त सुपा ता. पारनेर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने वीर आजी माजी जवानांचा सन्मान सोहळा सोमवार दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.स्वातंत्र्य दिनानिमित्त सुपा ग्रामपंचायतीच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात.
याही वर्षी सुपा गावचे प्रथम नागरिक माजी सरपंच ज्यांनी सुपा ग्रामपंचायतीचे सरपंच पद १५ वर्ष भूषविले त्यांचा सुपा शहराच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे असे माजी सरपंच हरिभाऊ नबाजी पवार यांच्या हस्ते दि.१३ रोजी झेंडावंदन करण्यात आले. दि.१४ रोजी सेवा निवृत्त कर्नल राजेंद्र आढाव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तर १५ ऑगस्ट रोजी सरपंच मनिषा रोकडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येणार आहे. यानिमित्त कर्नल राजेंद्र आढाव यांच्या सह सुमारे ४० ते ४५ आजी माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच मनिषा रोकडे, उपसरपंच विजय पवार, उद्योजक योगेश रोकडे, माजी सरपंच विजय पवार, माजी उपसरपंच सागर मैड, दत्तात्रय पवार, पंचायत समिती माजी सभापती दिपक पवार, तंटा मुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब पवार, सुरेखा पवार, अनिता पवार, पल्लवी काळे, सचिन पवार, सचिन वाढवणे, हरिदास पवार, लहाणू पवार, अजय पठारे, कानिफ पोपळघट, प्रविण पवार, प्रताप शिंदे, सुरेश नेटके, पप्पू पवार, पप्पू वाळुंज, भाऊसाहेब थोरात, अमोल पवार, प्रविण सुपेकर, वैभव काळे, शिर्के गुरुजी, राहूल नांगरे, राजू गवळी, मुन्ना शेख, धनंजय चाहेर, भाऊसाहेब गवळी, जेष्ठ पत्रकार मार्तंडराव बुचुडे, शिवाजी पानमंद, सुरेंद्र शिंदे यांच्या सह आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS