लोखंडी गज, कुर्हाडीने मारहाण; नऊ जखमी | परस्परविरोधी गुन्हा दाखल जामखेड | नगर सह्याद्री तीन एकर शेतीच्या वादातून तसेच जनावरे बांधल्याच्या क...
लोखंडी गज, कुर्हाडीने मारहाण; नऊ जखमी | परस्परविरोधी गुन्हा दाखल
जामखेड | नगर सह्याद्री
तीन एकर शेतीच्या वादातून तसेच जनावरे बांधल्याच्या कारणावरून भावकीच्या दोन गटात लोखंडी गज, काठाने व कुर्हाडीने केलेल्या जबर मारहाणीत एकुण नऊ जण जखमी झाले आहेत. ते जामखेड व अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. या प्रकरणी जामखेड पोलीसात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील सांगवी येथे रविवारी सकाळी सात वाजता घडली.
पहिली फिर्याद महादेव जालिंदर महारनवर (वय ४३, रा. सांगवी ता. जामखेड) यांनी दिली त्यामध्ये म्हटले आहे की, रवीवार दि २० रोजी सकाळी सात वाजता भागवत डिगांबर महारनवर, संजय डिगांबर महारनवर, वैभव भागवत महारनवर, योगेश संजय महारनवर, राम कुवर भागवत महारनवर, उर्मिला संजय महारनवर, सुशिला डिगांबर महारनवर (सर्व रा. सांगवी ता.जामखेड) या आरोपींनी संगनमत करुन तीन एकर शेतीच्या वादातुन तसेच फिर्यादिच्या जागेत जनावरे बांधल्याच्या कारणावरून फिर्यादि, फिर्यादिची भावजय, आई, वडील व मुलगा यांना लोखंडी गजाने लाकडी काठीने, कु-हाडीने शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहान करून गंभीर जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली.
दुसरी फिर्याद भागवत डिंगाबर महानवर (वय-४६ वर्ष धंदा-शेती रा-सांगवी ता जामखेड) यांनी दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, रवीवार दि. २० रोजी सकाळी साडेसहा वाजता घरासमोर बसलो असता आरोपी जांलीदंर रामचंद्र महानवर, दिपक महादेव महानवर, महादेव जांलीदर महानवर, विशाल महादेव महानवर, श्रीधर जांलीदंर महानवर, पुष्पा महादेव महानवर, अलका श्रीधर महानवर (सर्व रा सांगवी ता जामखेड) यांनी संगनमत करुन तीन एकर शेतीचे वादातुन फिर्यादीचे भाउ व भावजईस कुर्हाडीने मारहाण केली. सदर भांडण सोडवणे साठी फिर्यदी व त्याची पत्नी व मुलगा असे गेले असता यातील आरोपींनी फिर्यादी भागवत महारनवर, पत्नी रामकुवर महारनवर, मुलगा शशीकांत उर्फ वैभव महारनवर, भाऊ संजय महारनवर, भावजई-उमा संजय महानवर यांना लोखंडी गज, कुर्हाड व काठीने जबर मारहाण करून जखमी केले. जामखेडे पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती करत आहेत.
COMMENTS