मुंबई । नगर सह्याद्री झेड ब्लॅक या भारतातील आघाडीच्या ब्रँडच्या थ्री इन वन प्रीमिअम अगरबत्तीच्या नव्या जाहिरातीत दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रस...
मुंबई । नगर सह्याद्री
झेड ब्लॅक या भारतातील आघाडीच्या ब्रँडच्या थ्री इन वन प्रीमिअम अगरबत्तीच्या नव्या जाहिरातीत दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हे पित्याची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून एमएस धोनी झेड ब्लॅकचा ब्रँड अँबेसेडर आहे.
मनी की शांती, हे केवळ एक टीव्हीसी कॅम्पेन नाही, तर मानसिक आणि भावनिक संतुलन साधण्यासाठी प्रार्थनेचे महत्व दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धोनीचे व्यक्तिमत्त्व हे कॅम्पेनच्या संदेशात दिसून येत आहे. धोनीसोबत पुन्हा एकदा सहयोग करणे ही आमच्यासाठी बहुमानाची बाब आहे, असे म्हैसूर दीप परफ्युमरी हाउस व झेड ब्लॅकचे संचालक अंशुल अग्रवाल म्हणाले.
मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये झेड ब्लॅक अगरबत्तीचा जगात सर्वात मोठा कारखाना असून तो कारखाना सौरऊर्जेवर अगरबत्ती निर्मिती करतो. ३.५ कोटी अगरबत्त्या दर दिवशी बनविल्या जातात.
COMMENTS