सावेडी गावातील रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ अहमदनगर | नगर सह्याद्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्...
सावेडी गावातील रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ
अहमदनगर | नगर सह्याद्री
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर शहरात विकास पर्वाला सुरुवात झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत समाजामध्ये भाजपची विश्वासार्हता विकास कामातून निर्माण होत आहे. नियोजनबद्ध व दर्जेदार विकास कामे हा भाजपचा अजेंडा आहे. प्रभाग ६ मधील चारही नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट झाला आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले.
नगरसेवक रवींद्र बारस्कर यांच्या प्रयत्नाने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून सावेडी गाव येथे रस्त्याच्या कामाचा प्रारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते व माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेविका आशाताई कराळे, नगरसेविका पल्लवी जाधव, नगरसेविका वंदनाताई ताठे, शिवाजीराव कराळे, कामगार नेते बाबासाहेब बारस्कर, सचिन पारखी, नितीन शेलार, प्रदेश भाजप सदस्य किशोर वाकळे, उद्योजक सचिन शेठ बारस्कर, अतुल भंडारी, अनुराग आगरकर, अमित गटने, महेश नामदे, विवेक नाईक, अनिल मोहिते, बाळासाहेब गायकवाड, अॅड महेश काळे, अशोकराव वाकळे, अशोक गायकवाड, छबुराव वाकळे, अजिंक्य वाकळे, ज्ञानेश्वर काळे, चेतन जग्गी, शंतनू भापकर, रमेश चव्हाण, उदय कराळे, विठ्ठल बारस्कर, किशोर बारस्कर, बबन बारस्कर, बाळासाहेब वाकळे, रमेश बारस्कर, शंकर बारस्कर, कचरू बारस्कर, संजय आडोळे, दिलीप बारस्कर, रमेश चव्हाण, शंकर बारस्कर, योगेश गलांडे, पुष्कर कुलकर्णी, बाबासाहेब भिंगारदिवे, शिवा आढाव, डॉ.शुभम बारस्कर, भोरूशेठ बारस्कर, भारत बारस्कर, पप्पू आडोळे, पांडुरंग बारस्कर, मनोज आडोळे, सागर दंडवते, अमोल वाकळे, गणेश वाकळे, प्रदीप चेमटे, बाळासाहेब बारस्कर, विशाल भापकर, विकास भापकर,रवींद्र वाकळे, महेश कराळे, आतिश वाकळे, संदीप वाकळे, आदेश सातपुते, वैभव आडोळे दिलीप वाकळे, गणेश बारस्कर, अमोल दंडवते, संदीप बारस्कर, योगेश बारस्कर, अभिषेक बारस्कर, पवन क्षीरसागर, सनी दंडवते, शेखर दंडवते, अभिषेक वाकळे, जयंत वाकळे, अजित वाकळे, अक्षय बारस्कर, ज्ञानेश्वर पाडेकर, महेश वाकळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी महापौर वाकळे म्हणाले, महापौरपदाच्या माध्यमातून शहर विकासाबरोबर प्रभागाच्या विकासाला चालना दिली आहे. प्रभागातील विकासाचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले आहेत. नगरसेवक रवींद्र बारस्कर म्हणाले, सावेडी गावातील प्रवेशद्वाराच्या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तातडीने या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. प्रभागातील विविध विकासाची कामे मंजूर असून टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहेत. आम्ही चारही नगरसेवक प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांना गती दिली आहे. बाबासाहेब बारस्कर यांनी आभार मानले.
COMMENTS