याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम ३९२, ४२०, ५०६, १७०, ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध वारजे पोलीस करत आहेत.
पुणे । नगर सह्याद्री
पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरामधील राहणाऱ्या एका व्यावसायिकाला फसवून ५३ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. आपण सायबर पोलीस आहेत असे समोरच्या व्यावसायिकाला भासवून त्याच्याकडून पैसे लुटण्यात आले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने फेसबुकवर महिलेच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केले होते. या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका व्यावसायिकाशी मैत्री केली. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी वारजे परिसरातील एका हॉटेलवर बोलावले. त्यानंतर हॉटेलमध्ये महिलेऐवजी दोन पुरुष आले असून त्यांनी सायबर पोलीस असल्याचे भासवून पैशाची मागणी केली.
व्यावसायिकाला वारजे येथील एटीएममधून ५३ हजार ५०० रुपये काढण्यास भाग पाडले. त्यानंतर पैसे हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम ३९२, ४२०, ५०६, १७०, ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध वारजे पोलीस करत आहेत.
COMMENTS