सुपा | नगर सह्याद्री चालु वर्षीपाऊसाने दडी मारल्यानेे शेतकरी वर्ग कृषी सेवा केंद्राकडे फिरकत नसल्याने कृषी सेवा केंद्रे ओस पडलेली दिसून येत ...
सुपा | नगर सह्याद्री
चालु वर्षीपाऊसाने दडी मारल्यानेे शेतकरी वर्ग कृषी सेवा केंद्राकडे फिरकत नसल्याने कृषी सेवा केंद्रे ओस पडलेली दिसून येत आहेत. श्रावण महिना हा पाऊस पाणी व हिरवाईने नटलेला असतो परंतु चालु वर्षी सुरुवाती पासुनच संपूर्ण पारनेर तालुक्यात पावसाने चांगलीच पाठ फिरवली आसल्याने शेते ओस पडली आहेत.
पावसामुळे संपुर्ण खरीप हंगामा वाया गेला थोड्या फार रिमझिम पावसावर, मूग, वाटाणा, बाजरी, सोयाबीन या मुख्य पिकांची पेर केली परंतु उशीरा पेरणी केल्यामुुळे पिकाची वाढ खुटली तर जिथे पिकाची वाढा झाली तेथे कालबाह्य पिक झाल्याने ना त्यास दाणे भरले ना ती पिके परिपक्व झाली.
पेरणी नंतर आज अखेर पेरणी लागवड योग्य पाऊस झालाच नसल्याने शेतकरी कृषी सेवा केंद्राकडे ना बि बीयानाला ना खताना ना औषधाना फिरकताना दिसत नाही. त्यामुळे या दिवसांत नेहमीच गजबजणारी कृषी सेवा केंद्रे ओस पडलेली दिसत आहे.
आगामी सण उत्सवाचा विचार करुन फुल शेतीची लागवड शेतकरी या दिवसात आसतात. वाटाना, मूग, बाजरी, सोयाबीन ही पिके जोमात आसतात. शेतकरी या दिवसात कांदा पिक रोपे टाकण्याच्या तयारीत असतो. तर काही शेतकरी मेथी कोथिंबीर सह भाजी पाला पिके घेत असतात. त्यामुळे खते औषधे खरेदीच्या निमित्ताने शेतकर्यांच्या कृषी सेवा केंद्राकडे चक्रा वाढत आसतात. परंतु पाऊसाने दडी मारल्याने बळीराजा या कृषी सेवा केंद्राकडे ढुकुनही पहात नाही. अनेक कृषी सेवा केंद्र चालक हंगाम पाहून शेतकर्यांची अडवणूक करत असतात. बि बियाणे खते औषधांचा कृत्रिम तुटवडा दाखवून चढ्या भावाने विक्री करत असतात. परंतु या वष पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी अशा विक्रेत्याकडे जात नसल्याने जे विक्रेते या दिवसात खुप भाव खात असतात ते आज माशा मारताना दिसत आहेत. एकप्रकारे निसर्गाने अशा विक्रेत्यांना चांगली चपराक दिलेली दिसत आहे. याबाबत शेतकरी ही उघड बोलत आहेत.
COMMENTS