पारनेर शहरात आगमन होताच फटायांची आतिषबाजी पारनेर | नगर सह्याद्री राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधा...
पारनेर शहरात आगमन होताच फटायांची आतिषबाजी
पारनेर | नगर सह्याद्री
राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंगळवारी पारनेर दौर्यावर होते. यावेळी पारनेर शहरामध्ये आमदार नीलेश लंके गटाकडून नाराज असलेले नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी मंत्री विखे यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी ३०० ते ४०० समर्थक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पारनेर शहरांमध्ये आगमन झाल्यानंतर औटी समर्थकांनी फटायांची आतिषबाजी करत मंत्री विखे यांचे स्वागत केले. यावेळी विखे यांनी माजी नगराध्यक्ष औटी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.
यावेळी विजय औटी यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर पारनेर शहरातील अनेक समस्या व प्रश्न मांडले तसेच निवेदनही दिले.
यावेळी अहमदनगर जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, भाजप कार्यकारणी प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे, पारनेर तालुका भाजप अध्यक्ष सुनील थोरात, युवा नेते राहुल पाटील शिंदे, सचिन पाटील वराळ, राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले, सरपंच मनोज मुंगसे, युवा नेते प्रितेश पानमंद, युवा नेते नंदू औटी, डॉ. भाऊसाहेब खिलारी, योगेश रोकडे, पारनेर भाजपा शहराध्यक्ष किरण कोकाटे, अंबादास काकडे, नगरसेवक अशोक चेडे, दिलीप औटी, महिला नेत्या मयुरी औटी, महेंद्र बोरुडे, स्वप्निल पुजारी, पुष्कर बोरुडे, महेश ठुबे, मंगेश कावरे, ओमकार झंजाड, आदी यावेळी उपस्थित होते. तसेच माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS