निघोज | नगर सह्याद्री जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण आग्रही असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँ...
निघोज | नगर सह्याद्री
जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण आग्रही असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांनी व्यक्त केले आहे.
वाडेगव्हाण सोसायटीला जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सोसायटी व वाडेगव्हाण, पाडळी व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सरपंच बाळासाहेब सोनवणे, तालुका विकासाधिकारी प्रभाकर लाळगे, रामचंद्र शेळके, राजेंद्र शेळके, रमेश गायकवाड, मच्छिंद्र बढे, अण्णा कुरंजुले, संभाजी वारे, प्रशांत शेळके ,जालिंदर तानवडे, विनायक खंदारे, प्रमोद घनवट, माणिकराव शेळके, सुभाष खणकर, गणेश शेळके, राहुल शेळके उपस्थित होते.
गीतांजली शेळके यावेळी म्हणाल्या, शेतकरी आज आर्थिक परिस्थितीत आहे. शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला व शेतकर्यांना होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.
जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सोसायटी पदाधिकारी व सचिव तसेच कर्मचारी यांनी जिल्हा बँक माध्यमातून शेतकर्यांच्या आर्थिक विकास योजना आहेत. त्यांची माहिती शेतकर्यांना व सर्व सामान्य जनतेला देण्यासाठी सोसायटी पातळीवर शेतकरी मेळावे घेऊन लोकप्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले.
COMMENTS