प्रभुजी प्युअर फूड या फिल्ममध्ये शाहरुख आणि रश्मीका एकत्र काम करणार आहेत. यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये या जाहिरातीचे शूट पार पडले.
मुंबई । नगर सह्याद्री
देशाची नॅशनल क्रश रश्मीका मंदाना आणि बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान दोघे काम करून स्क्रीन शेअर करणार आहेत. दोघांना पडद्यावर एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. सोशल मीडियावरती शाहरुख रश्मीकासोबत एका फोटासाठी पोझ देतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.
या फोटोनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं. यावरुन सोशल मीडियात नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला आहे. अनेकांनी त्यांच्या जोडीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच दोघांना एकत्र काम करताना पाहण्यात मजा येईल, असेही प्रेक्षक म्हणत आहेत. प्रभुजी प्युअर फूड या फिल्ममध्ये शाहरुख आणि रश्मीका एकत्र काम करणार आहेत. यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये या जाहिरातीचे शूट पार पडले.
यावेळी या दोघांचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. लवकरच ही जाहिरात प्रदर्शित होणार आहे. पण अद्याप या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अधिकृतरित्या या एकत्र कामाबाबतची घोषणा केली नाही. परंतु चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात या जोडीला प्रतिसाद दिला आहे.
COMMENTS