अशोकभाऊ फिरोदियातील विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा उत्साहात अहमदनगर | नगर सह्याद्री अपयशाने खचून न जाता, ध्येय प्राप्तीसाठी संघर्ष क...
अशोकभाऊ फिरोदियातील विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा उत्साहात
अहमदनगर | नगर सह्याद्री
अपयशाने खचून न जाता, ध्येय प्राप्तीसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी असे प्रतिपादन कर्नल चेतन गुरुबक्ष यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रतिनिधी (हेड बॉय, हेड गर्ल) यांची नियुक्ती व त्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पाडला. स्कूलच्या असिस्टंट हेड बॉय म्हणून आर्यन नितीन डुबेपाटील, असिस्टंट हेड गर्ल शाल्मली आनंद तरवडे, हेड बॉय रोहन अशोक अडसरे, हेड गर्ल सिध्दी प्रमोद मते यांची निवड करण्यात आली आहे.
शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कर्नल चेतन गुरुबक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. पूजा गुरुभक्ष यांच्यासह संस्थेच्या विश्वस्त सुनंदाताई भालेराव, सल्लागार मंडळाचे सदस्य सीए रोहित बोरा, भुषण भंडारी, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा उपाध्ये, उच्च माध्यमिकच्या प्रमुख आश्विनी रायजादे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांची हस्ते संस्थेचे दिवंगत प्रमुख कार्यवाहक अशोकभाऊ फिरोदिया व शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. रेणुका पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. अध्यापिका रुबीना शेख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रवींद्र उजागरे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधींच्या निवड प्रक्रिये बाबत व त्यांच्या कर्तव्य बाबतची माहिती दिली. तर प्रीतम जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या ध्येय व आवडीबद्दल माहिती दिली.
कर्नल चेतन गुरुबक्ष यांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधींना शोल्डर पिप्स, लाईन यार्ड व नेम प्लेटस प्रदान करण्यात आल्या. कर्नल गुरुबक्ष यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जीवनात धेय ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी. यश मिळवण्यासाठी शिस्त, खडतर परिश्रम व सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला. तर अपयशाने खचून न जाता, ध्येय प्राप्तीसाठी परिस्थितीशी संघर्ष करण्याचे आवाहन केले. तर कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी कौतुक केले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया व खजिनदार प्रकाश गांधी यांनी विद्यार्थी प्रतिनिधींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र उजागरे यांनी केले. आभार रुबीना शेख यांनी मानले.
COMMENTS