पारनेर | नगर सह्याद्री ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आम्ही टाकळीकर या सामाजिक संस्थेने दोन प्राथमिक शाळा सह एका माध्यमिक विद्याल...
पारनेर | नगर सह्याद्री
७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आम्ही टाकळीकर या सामाजिक संस्थेने दोन प्राथमिक शाळा सह एका माध्यमिक विद्यालयाला शैक्षणिक सुविधांसाठी १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे स्मार्ट टीव्ही भेट दिले आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी टाकळी ढोकेश्वर येथील प्राथमिक शाळा बेटवस्ती बांडे मळा व रयत शिक्षण संस्थेच्या प्र. ग.खिलारी विद्यालय टाकळी ढोकेश्वर मधील विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही शिक्षण अधिक सुलभ मिळावे या हेतूने सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणार्या ’आम्ही टाकळीकर’ग्रुपने सॅमसंगचा ५५इंची एलइडी स्मार्टटीव्ही भेट दिला.
ही भेट सेवा सोसायटी चेअरमन नारायणराव झावरे, व्हा. चेअरमन मोहनराव रांधवन प्रतिष्ठान व ग्राम पदाधिकारी यांच्या हस्ते शाळा समितीचे अध्यक्ष पंडितराव झावरे, मुख्याध्यापक कर्ण रोकडे व शिक्षकांनी या भेटीचा स्विकार केला.
प्रभारी मुख्याध्यापक कर्ण रोकडे सरांनी आम्ही टाकळीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बांडे, सचिव विलास गोसावी व सर्व सदस्यांच्या या दातृत्वाबद्दल आभार व्यक्त केले. या प्रसंगी सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खिलारी, सदस्य, विविध संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS