जिल्हा बँकेचे संचालिका गीतांजली शेळके | औषधी विक्रेते संघटनेच्या वतीने सन्मान पारनेर | नगर सह्याद्री सध्या स्पर्धेचे युगात तरुणांनी नोकरीच्...
जिल्हा बँकेचे संचालिका गीतांजली शेळके | औषधी विक्रेते संघटनेच्या वतीने सन्मान
पारनेर | नगर सह्याद्री
सध्या स्पर्धेचे युगात तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या नवनवीन संधी शोधून तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या व जी. एस. महानगर बँक संचालिका गीतांजली शेळके यांनी केले
औषध विक्रेते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ औषध विक्रेते रवींद्र बांडे होते. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, व महानगर बँक संचालिका म्हणुन निवड झाल्याबद्दल गीतांजली शेळके यांचा सत्कार यावेळी करण्यात आला
यावेळी विकास भनगडे, अक्षय शिंदे, संकेत थोपटे, प्रथमेश पुरी, कमलेश जाधव, शुभम निवडुंगे, आतिश गागरें, प्रियांका गागरे, डॉ दत्ता दातीर, तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे, व वैदयकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेळके बोलताना म्हणाल्या की, टाकळी ढोकेश्वर परिसरात लघु औद्योगिक वसाहत असणे गरजेचे आहे. पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे प्रयत्न करणार आहे. टाकळी ढोकेश्वर परिसरात जनतेच्या मागणीवरून जी एस महानगर बँक शाखा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पारनेर तालुक्यात जलसंधारण होणे गरजेचे आहे. ग्रामविकासात युवकांनी योगदान देणे गरजेचे आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना ग्रामपंचायत मार्फत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
COMMENTS