डिकसळ येथील स्मशानभूमी सुशोभीकरण व विकासकामाचा भूमिपूजन समारंभ पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील डिकसळ गावच्या विकासासाठी कटीबद्ध...
डिकसळ येथील स्मशानभूमी सुशोभीकरण व विकासकामाचा भूमिपूजन समारंभ
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील डिकसळ गावच्या विकासासाठी कटीबद्ध असून स्व. आमदार वसंतराव झावरे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे पार पडली आहेत. यापूर्वी ही डिकसळ येथील गावाची वेस, ग्रामपंच्यात कार्यालय, आंगणवाड्या, पाझर तलाव अशी अनेक विकास कामे करण्याची संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुजित झावरे पाटील यांनी केले.
डिकसळ येथील स्मशानभूमी सुशोभीकरण व गावांतर्गत स्ट्रीट लाईट बसविणे विकासकामांचे भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुभाषराव दुधाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सुजित झावरे म्हणाले, खासदार सुजय दादा विखे पाटिल यांच्या माध्यमातून डिकसळ ते जामगाव, जामगाव ते देखणे गुंजाळ पर्यंत अशा आठ कोटी रुपयांच्या दळणवळनाचा मुख्य रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. लहान गावामध्ये एकता असते. लहान गावामध्ये विकासकामांच्या सुविधा पुरविल्यावर लोक त्याची जाण धरत आसतात. लोकांच्या उपयोगी पडणे महत्वाचे असते. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात तुमचे विचार कुठल्या पक्षाची निगडित आहात यांचे कुणालाही घेणे देणे नसून आमच्या गावामधील विकास कामामध्ये तुमचे योगदान किती आहे हे लोक नेहमी पाहत असतात. स्मशानभूमी सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून भविष्यकाळात पेव्हीग ब्लॉक देणार आसल्याचे जाहीर केले.
यावेळी सरपंच भाऊसाहेब चौधरी, उपसरपंच आशाबाई येवले, चेअरमन किसन चौधरी, भगवान शिंदे, राधूजी ठाणगे, प्रितेश पानमंद, साहेबराव चौधरी, सोनू सुर्यवंशी, बबन परांडे, सोपान चौधरी, सुरेश निमसे, मच्छिंद्र वाबळे, राहुल चौधरी, शुभम शिंदे, शिवाजी काकडे, बाबाजी येवले, मच्छिंद्र काकडे, बाबाजी वाबळे, जयसिंग काकडे, शिवाजी काकडे, गणेश महाराज शिंदे , ग्रामसेवक ठेकेदार साहेबराव नरसाळे, राहुल तांबे, पत्रकार राम तांबे व ग्रमस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
COMMENTS