संगमनेर | नगर सह्याद्री जमविलेले लग्न मोडल्याने तालुयातील कोल्हेवाडी येथे राहणार्या तरुणाने वडगावपान शिवारात झाडाला गळफास घेऊन आपली जीवन य...
संगमनेर | नगर सह्याद्री
जमविलेले लग्न मोडल्याने तालुयातील कोल्हेवाडी येथे राहणार्या तरुणाने वडगावपान शिवारात झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या दहशतीमुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. याप्रकरणी तरूणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन सीताराम खुळे (वय ३२, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह तालुयातील वडगावपान शिवारात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
नितीन खुळे याच्या मृत्यूस गावातील काही प्रतिष्ठीत नागरीक कारणीभूत असल्याचा आरोप मयत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात नितीन खुळे याला बोलावुन घेऊन दमदाटी केली. दमदाटी करणारे ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी नसतानाही ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करतात.
आपल्या भावाच्या मृत्युला कारणीभूत असणार्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा मयत युवकाच्या नातेवाईकांनी दिला आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांना त्यांनी निवेदन दिले आहे.
संगमनेर कॉटेज रुग्णालयात सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मयत नितीन खुळे याचा मोबाईल व त्याच्याजवळ मिळून आलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या चिठ्ठीमध्ये गावातील अनेक प्रतिष्ठीतांची नावे आहेत. ज्यांच्या त्रासामुळे नितीन याने आत्महत्या केली आहे, असे मयताच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याबाबत संजय तुकाराम खुळे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
COMMENTS