प्रवीण तांबे | नगर सह्याद्री पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिना संपला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. पारनेर तालुयासही दुष्काळाच्य...
प्रवीण तांबे | नगर सह्याद्री
पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिना संपला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. पारनेर तालुयासही दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पाऊस नसल्याने शेतातील पिकांनी देखील माना टाकल्या आहेत. तालुयातील गोरेगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करत आहे.
पावसाने पिकांना जीवसं भेटेल या आशेने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसला आहे. गोरेगांव परिसरातील तरुण वर्ग आधुनिक शेतीकडे वळला आहे. परंतु पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी अर्थिक चिंतेत सापडला आहे. गोरेगांव साठी वरदान असणारे पाझर तलाव या पूर्वीच आटले आहे.
त्यात यावर्षी देखील पाऊस अत्यल्प झाल्याने विहिरी, बोअरवेल यांची पाणी पातळी खालावली आहे. यंदा शेतकर्यांनी जेमतेम झालेल्या पावसावरच मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, वटाणा, कांदा, मिरची आदी पिकाची लागवड केली. पण पावसाने दांडी मारल्याने शेतातील उभे पिके पाण्याअभावी करपली आहेत.
त्यामुळे आता पिकाचे पंचनामे करून शेतकर्यांना पीकविमा तातडीने द्यावा अशी मागणी प्रगतशील शेतकरी गणेश तांबे, सबजी शेरकर, विकास काकडे, साहेबराव नरसाळे, धनंजय नागरे, प्रवीण नरसाळे, संदीप तांबे, संतोष नरसाळे, आदी शेतकर्यांनी केली आहे.
पिक वाया गेल्याने शेतकरी चिंतेत
पावसाअभावी पिके करपल्याने हाता तोंडाशी आलेले पिके गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. लवकरात लवकर पिकविम्यासाठी पंचनामे सुरू करणासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-सुमन बाबासाहेब तांबे, लोकनियुक्त सरपंच, गोरेगांव
COMMENTS