पुणे / नगर सह्याद्री कोरोना संकट काळात लस ही संजीवनी ठरली. सीरम इन्सिट्यूचे सर्वेसर्वा सायरस पुनावाला यांचं यात मोठं योगदान आहे. दरम्यान आत...
कोरोना संकट काळात लस ही संजीवनी ठरली. सीरम इन्सिट्यूचे सर्वेसर्वा सायरस पुनावाला यांचं यात मोठं योगदान आहे. दरम्यान आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे.
या वक्तव्यावरून आता मोठी खळबळ उडाली आहे. सध्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी सुरु आहेत त्या सर्वश्रुत आहेत. मध्यंतरी शरद पवार यांचं वयावरुन विविध चर्चा झडल्या. ते सध्या 82 वर्षांचे आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा त्यांनीदेखील शरद पवार यांना आता निवृत्त व्हा, असं वक्तव्य केलं होतं. परंतु शरद पवार हार न मानता पुन्हा जिद्दीने लढत आहेत. परंतु आता सायरस पुनावाला यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून खळबळ उडाली आहे.
सायरस पुनावाला यांनी शरद पवार यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. “माझं शरद पवारांना म्हणणं आहे की, त्यांना देशाचा पंतप्रधान होण्याची दोनवेळा संधी होती. पण त्यांनी ती संधी घालवली. ते खूप फार हुशार आहेत. ते देशाची फार सेवा करु शकले असते. पण त्यांची संधी गेली. आता त्यांचं वय झालं आहे. त्यांनी आता रिटायर व्हावं”, असं वक्तव्य सायरस पुनावाला यांनी केलंय.
शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. शरद पवार हे पुन्हा एकदा पक्षबांधणीला लागले आहेत. त्यांचा उत्साह पाहता कार्यकर्तेही त्यांना साथ देऊ लागले आहेत.
COMMENTS