मुंबई / नगर सह्याद्री : मुंबईत मंत्रालयाच्या आवारात अनेक आंदोलने होत असतात. दरम्यान आता एका आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अप्पर ...
मुंबई / नगर सह्याद्री : मुंबईत मंत्रालयाच्या आवारात अनेक आंदोलने होत असतात. दरम्यान आता एका आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अप्पर वर्धा धरण ग्रस्तांनी मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील जाळीवर उड्या मारत आंदोलन केले. दरम्यान या अशा उडया मारण्याने अन आंदोलनाने एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. सदर शेतकऱ्यांच्या जमिनी १९७२ मध्ये धरणासाठी अधिग्रहन केले होते.
मात्र या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही, तसेच स्थानिकांना नोकरी देण्यात आलेले नाही. गेल्या १०५ दिवसापासून हे आंदोलन सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आज मंत्रालयात विविध पद्धतीने पास घेऊन ३० ते ४० आंदोलकांनी प्रवेश केला आणि मागण्या संदर्भात घोषणा देण्यास सुरुवात केली. आता यातील आंदोलक सुरक्षा जाळ्यावर घोषणा देत आंदोलन करत आहेत.
यावेळी शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या. काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर आंदोनावेळी आंदोलकांनी मंत्री दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
COMMENTS