याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संजय अनिल मखवाना (२२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
मित्राला चहा पिण्यासाठी पैशाची मागणी केली असता मित्राने नकार दिल्याने मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संजय अनिल मखवाना (२२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये विशाल प्रभाकर पाटोळे (वय 22) हे गंभीर जखमी झाले आहेत.
विशाल हा रविवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाला असताना संजयने चहा पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पैसे न देता कामावर जाण्यास उशीर होत असून माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्याने संतापलेल्या संजयने खिश्यातून धारदार चाकू काढून विशालवर भर रस्त्यातच सपासप वार करून घटनास्थळावरून पळून गेला. घडलेली घटना कल्याण परिसरामध्ये घडली आहे.
विशाल आणि संजय यांची यापूर्वी चोरीचे गुन्हे सोबत केल्याने त्यांची आधीपासूनच ओळख असल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर विशालचा जबाब घेऊन त्याच्या तक्रारीवरून हल्लेखोर संजय यांच्याविरोधात गुन्हा दखल करून वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटना घडल्यापासून हल्लेखोर संजय फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
COMMENTS