शनिवारी सकाळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी त्यांची पक्षातून रवानगी केली असल्याचे सांगितले आहे.
बीड । नगर सह्याद्री
शिवसेना जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे यांनी राष्ट्रवादीतील अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेत घोषणा दिली. त्यानंतर त्यांची ठाकरे गटातून रवानगी करण्यात आली आहे. तर घुगे अजित पवार गटात रविवारी प्रवेश करणार असून ठाकरे गटाला धक्का बसणार आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून बप्पासाहेब घुगे शिवसेनेत कार्यरत आहेत. मध्यंतरी राजकीय वर्तुळात त्यांची जिल्हाप्रमुख पदासाठीही चर्चा रंगली होती. अशातच त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय आहे. घुगे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पत्रक काढून आपण अजित पवार गटात जाणार असल्याची माहिती दिली आहे.
शनिवारी सकाळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी त्यांची पक्षातून रवानगी केली असल्याचे सांगितले आहे. आगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आपल्या बाजूने वळवल्याने अजित पवार गटानेही भर पाडली आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी अजित पवार गटाकडून पक्षात घेतले जात आहेत.
COMMENTS