नगर सह्याद्री टीम Benefits of kiwi fruit : डेंग्यू हा आजार सर्वपरिचित आहे. यात होणारा त्रास व त्याचे इतर दुष्परिणाम यामुळे अनेक जण या आजार...
नगर सह्याद्री टीम
Benefits of kiwi fruit : डेंग्यू हा आजार सर्वपरिचित आहे. यात होणारा त्रास व त्याचे इतर दुष्परिणाम यामुळे अनेक जण या आजाराला घाबरूनच असतात. हा आजार विषाणू एडिस एजिप्ती नावाच्या डासाच्या चाव्याव्दारे पसरतो.
डेंग्यूपासून बरे होण्यासाठी, रुग्णांना विशेष डाएट फॉलो करावे लागते. यात विविध प्रकारचे फळे आणि भाज्यांचा समावेश असतो.आज आपण अशा एका फळाबद्दल जाणून घेऊयात की जे डेंग्यू रुग्णांना अत्यंत आरोग्यदायी ठरू शकते. त्याचे अनेक फायदे रुग्णांना होऊ शकतात. हे फळ म्हणजे किवी फळ.
डेंग्यूच्या रुग्णांना किवी अनेक प्रकारे मदत करू शकते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम आणि फायबर यांसारखे पोषक तत्व चांगल्या प्रमाणात असतात. हे पोषक घटक डेंग्यूची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात.
किवीचे इतर फायदे
रोग प्रतिकारशक्ती वाढवते
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. हे संक्रमणाशी लढण्यास मदत करू शकते.
रक्तदाब नियंत्रण
किवीमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
कर्करोग
किवीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखू शकतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते
COMMENTS