शनिवारी रात्री ८ च्या दरम्यान तुळसाबाई गंगाराम मुसळे या टाकळी हाजी रस्त्यावर शेतात राहत असून दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला.
पुणे । नगर सह्याद्री
म्हसे (ता. शिरूर) येथे शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला केला. महिला घटनास्थळावरून पळाल्याने वाचली. वनविभागाला मागणी करूनही पिंजरे लावले जात नसल्याने ग्रामस्थाना बिबट्यांच्या दहशतीखाली जगावे लागत आहे.
शनिवारी रात्री ८ च्या दरम्यान तुळसाबाई गंगाराम मुसळे या टाकळी हाजी रस्त्यावर शेतात राहत असून दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या महिलेने डोक्याला स्कार्प बांधला असल्यामुळे पंजाची जखम झाली. या महिलेला जखम झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या परिसरामध्ये बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, पशुदानाबरोबरच मनुष्य प्राण्यावर हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, असे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे म्हणाले. त्यामुळे वनविभागाने त्वरित यापरिसरातील गावांमध्ये पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
COMMENTS