वडिलांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने घरासमोर पडलेले फरशाच्या तुकडयाने व लाकडी फळीच्या तुकडयाने तोंडावर मारहाण केली.
पंढरपूर । नगर सह्याद्री
वडील लग्न जमवत नसल्याने संतप्त मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडील गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने पंढरपूर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
जितू हुकुम कदम (वय २८, रा. भगवान नगर, पंढरपूर) हे वडिल हुकुम माणिक कदम (वय ५८) यांच्याकडे लग्न करुन देण्यासाठी हट्ट करून बसले होते. रविवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान मुलगा वडिलाना "तू माझे लग्न करीत नाही, तुला मी आता ठेवत नाही" असे म्हणून शिवागाळ करत होता. त्यानंतर वडिलांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने घरासमोर पडलेले फरशाच्या तुकडयाने व लाकडी फळीच्या तुकडयाने तोंडावर मारहाण केली.
वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोनि अरुण फुगे, सपोनि प्रकाश भुजबळ, पोसई प्रशांत भागवत यांनी देऊन पुढील तपासास प्रकाश भुजबळ यांनी सुरुवात केली.
COMMENTS