घटनास्थळी मनसे तालुकाप्रमुख मन्मथ परबत्ते दाखल झाले व ट्रॅक्टरची चावी काढून घेऊन माझ्या गाडीस पकडतोस काय? असे म्हणत तलाठ्याशी वाद घालून शिवीगाळ केली.
सांगली । नगर सह्याद्री
शासकीय वाळू अवैधरित्या उपसा करून ती वाहतूक करीत असताना बंदोबस्त करणाऱ्या तलाठ्यासोबत वाद घालून अडथळा निर्माण केल्या प्रकरणी मनसेच्या देगलूर तालुका प्रमुखासह ट्रॅक्टर चालकावर देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विना नंबरच्या ट्रॅक्टरमध्ये २० ऑगस्ट रोजी शहरालगत असलेल्या लेंडी नदी पूल ते बागन टाकळी या रस्त्यावरून शासकीय वाळू अवैधरित्या वाहतूक करीत असताना हनुमान हिप्परगा सज्जाचे तलाठी राजेश गायकवाड यांनी अटकाव केला. त्यावेळी घटनास्थळी मनसे तालुकाप्रमुख मन्मथ परबत्ते दाखल झाले व ट्रॅक्टरची चावी काढून घेऊन माझ्या गाडीस पकडतोस काय? असे म्हणत तलाठ्याशी वाद घालून शिवीगाळ केली.
याप्रकरणी तलाठी राजेश गायकवाड यांनी आरोपी मनसे तालुकाप्रमुख मन्मथ परबते व ट्रॅक्टर चालक सचिन कांबळे (रा.उ. सांगवी) या दोघांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.
COMMENTS