नगर सह्याद्री टीम Apple iPhone 15 : Apple ने अखेर iPhone 15 लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. हा लॉन्च इव्हेंट 12 सप्टेंबर रोजी आयोजित ...
नगर सह्याद्री टीम
Apple iPhone 15 : Apple ने अखेर iPhone 15 लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. हा लॉन्च इव्हेंट 12 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाईल. इव्हेंटमध्ये कंपनी iPhone 15 चे चार मॉडेल लॉन्च करणार आहे. यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे. (Apple iPhone 15 launch date )
iPhone 15 Pro Max अधिक लोकप्रिय होईल
एनालिस्ट Ming-Chu Kuo यांनी सांगितल्यानुसार iPhone 15 सीरीजचे टॉप मॉडेल सर्वाधिक लोकप्रिय असणार आहे. त्यांच्या मते, 'iPhone 15 Pro Max चा हिस्सा 35-40% असेल. त्यांना 15 प्रो मॅक्स 14 प्रो मॅक्स पेक्षा 10-20% जास्त विकण्याची अपेक्षा आहे.
त्याच्या रिपोर्टनुसार, हे मॉडेल सर्वाधिक लोकप्रिय असेल कारण त्यात पेरिस्कोप झूम कॅमेरा मिळेल.ज्यामुळे विक्रीला खूप फायदा होईल. iPhone 15 Pro Max चे पेरिस्कोप मॉड्यूल सप्लायर Largan हे आहेत. ते Huawei साठी 60 टक्क्यांहून अधिक पेरिस्कोप लेन्स पुरवते.
iPhone 15 हिरव्या रंगात येईल
iPhone 15 हिरव्या रंगात येण्याची शक्यता आहे. तसेच इतर मॉडेल हिरवा, निळा, पांढरा आणि काळ्या रंगात येण्याची शक्यता आहे.
COMMENTS