आलिया भट्ट हिने एक खास फोटो शेअर करत म्हणाली की कोणी आम्हाला एकसोबत काम देईल का, म्हणजे आम्हाला गप्पा मारता येतील.
मुंबई । नगर सह्याद्री
आलिया भट्ट ही बाॅलिवूडची टाॅप अभिनेत्री आहे. काही दिवसनपूर्वीच आलियाच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी हा प्रेक्षकांच्या समोर आला. या चित्रपटाने धमाकेदार अशी कामगिरी केली आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्टसोबतच रणवीर सिंहने देखील मुख्य भूमिकेमध्ये काम केले आहे. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे प्रमोशन करताना आलिया भट्ट आणि रणवीर सिंह सोबत दिसले होते. काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट राहा हिला घेऊन करीना कपूर खानच्या घरी गेली होती. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आलिया आणि करीना कपूर या दोघी अगोदरपासूनच चांगल्या मैत्रिणी आहेत. आलिया भट्ट आणि करीना कपूर यांनी अनेक चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केले. परंतु एकदाही एकाच चित्रपटामध्ये काम करताना कधीच आलिया भट्ट आणि करीना कपूर सोबत दिसल्या नाहीत.
आलिया भट्ट हिने एक खास फोटो शेअर करत म्हणाली की कोणी आम्हाला एकसोबत काम देईल का, म्हणजे आम्हाला गप्पा मारता येतील. आलियाची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करून त्याची मते व्यक्त करताना दिसत आहेत. आलिया भट्ट आणि करीना कपूर यांनी थेट सोशल मीडियावरच पोस्ट शेअर करत कामाची मागणी केल्यामुळे अनेकजण आर्श्चय व्यक्त करत आहेत. या पोस्टवर करण जोहर याने देखील कमेंट करत त्याचे मत व्यक्त केले आहे.
COMMENTS