मुंबई / नगर सह्याद्री Ajit Pawar Latest News : सध्या महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे. दरम्यान अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित ...
मुंबई / नगर सह्याद्री
Ajit Pawar Latest News : सध्या महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे. दरम्यान अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांचे राजकीय महत्व वाढीस लागले. विविध निर्णय घेण्यास त्यांनी सुरुवात केली. दरम्यान आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे.
साखर कारखानदारांच्या कर्जाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना झटका दिला आहे. साखर कारखानदारांच्या कर्जासंदर्भात अजित पवार यांनी काही निर्णय घेतले होते. आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्याच्या कारखान्यांवरील बंधन हटवली आहेत. एनसीडीसीने मंजूर केलेल कर्ज मिळवण्यासाठी अजित पवार यांनी जाचक अटी घातल्या होत्या. त्या अटी देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेतल्या आहेत.
काय होती अजित पवारांची अट ?
अजित पवार यांनी कर्जासाठी कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा अशी अट घातली होती. परंतु फडणवीसांनी यावर वेगळा निर्णय घेत स्थगिती दिली. अजित पवार यांचा शासन निर्णयातील वाढता हस्तक्षेप रोखण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जातय अशी चर्चा सध्या रंगतीये.
निर्णय मागे घेण्याचे काय कारण ?
अजित पवारांनी ज्या नवीन अटी घातल्या त्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट झाल्यानंतर फडणवीसांनी निर्णय मागे घेतला. यामुळे साखर कारखाने असलेल्या भाजपा नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अजित पवार यांनी फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर ती फडणवीसांकडे जाणार
एका निर्णयानुसार आतां यापुढे अजित पवार यांनी कुठल्याही फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. त्यानंतर ती फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे येईल. अंतिम सहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल येईल. पण त्याआधी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी लागणार आहे.
COMMENTS