अजित पवार गटाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून बीडची उत्तर सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी बैठक घेणार होते. मात्र, आता अजित पवारांची ही उत्तर सभा रद्द होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून बीडची उत्तर सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच अजित पवार यांची बीडमध्ये २७ ऑगस्टला होणारी सभा रद्द झाल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार विरुद्ध असे दोन पाहायला मिळत आहे. दरम्यान, शरद पवार हे जिल्ह्यातील अजित पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांच्या जाहीर सभा घेत आहेत. शरद पवार यांनी १७ ऑगस्टला बीडमध्ये सभाही घेतली होती. त्यामुळे शरद पवारांच्या याच सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवारांची २७ ऑगस्ट रोजी सभा होणार होती. मात्र आता अजित पवार यांची सभा रद्द होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे
शरद पवारांच्या बीडमधील सभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभा घेण्याचे ठरले होते. त्यामुळे शरद पवारांच्या बीडच्या सभेनंतर उत्तर सभेचे धनंजय मुंडे यांच्यावतीने अयोजन करण्यात येणार होते. मात्र, बीडच्या सभेत शरद पवारांनी आपल्या भाषणात अजित पावर किंवा धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याचे टाळले. दरम्यान, आता अजित पवार गटाच्या झालेल्या एका बैठकीत यावर चर्चा झाली. ज्यात, शरद पवारांनी कोणतेही टीका केली नसताना त्यांना उत्तर काय देणार? यावर चर्चा झाली. त्यामुळे २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये होणारी अजित पवारांची उत्तर सभा रद्द होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या दरम्यान. बीडमध्ये १७ ऑगस्ट रोजी झालेल्या शरद पवारांच्या सभेत पैसे देऊन लोकांना जमवल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे काही महिलांनी पैसे वाटल्याचा तथाकथित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पवारांच्या सभेसाठी महिलांना पैसे देऊन आणल्याचा दावा केला जात आहे. मात्र, दोन्ही गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
COMMENTS