ऐश्वर्या फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाही तर, तिच्या निळ्या रंगाच्या डोळ्यांमुळे देखील ओळखली जाते. परंतु ऐश्वर्याने तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला
मुंबई । नगर सह्याद्री
अभिनेत्री ऐश्वर्या राय जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. ४९ व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. आजदेखील ऐश्वर्या सोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेते उत्सुक असतात. ऐश्वर्या रायचे सौंदर्य तिच्या डोळ्यांनी घायाळ करत असते. इंडस्ट्रीमधील सर्वजण ऐश्वर्याच्या डोळ्याचे कौतुक करत असते. ऐश्वर्या फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाही तर, तिच्या निळ्या रंगाच्या डोळ्यांमुळे देखील ओळखली जाते. परंतु ऐश्वर्याने तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतकेच नाही तर ऐश्वर्या राय नेत्रदान मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. तसेच ही अभिनेत्री लोकांना नेहमीच चांगल्या कार्यासाठी प्रेरित करत असते. ऐश्वर्या रायने स्वतःचे सुंदर डोळे आय बँक एसोसिएशन ऑफ इंडियाला डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्या राय हिचं निधन झाल्यानंतर तिचे डोळे एखाद्या गरजू व्यक्तीला मिळू शकतात. अभिनेत्रीच्या निधनानंतर ऐश्वर्या राय हिच्या डोळ्यामुळे कोणा गरजू व्यक्तीला नवी दृष्टी मिळणार आहे.
नेत्रदानाबद्दल अभिनेत्री म्हणाली की जर तिचे डोळे कोणाच्या आयुष्यात प्रकाश आणू शकत असतील तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. त्यामुळेच ऐश्वर्याने डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्या तिच्या डोळ्यांच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. फक्त ऐश्वर्या राय बच्चन नाही तर, अभिनेता सलमान खान, आमिर खान, ऋतिक रोशन, महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी देखील अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
COMMENTS