नागरिकांनी सतर्क रहावे; प्रशासनाचे आवाहन अहमदनगर / नगर सह्याद्री - अहमदनगर शहरातील सावेडी गाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. श...
नागरिकांनी सतर्क रहावे; प्रशासनाचे आवाहन
अहमदनगर शहरातील सावेडी गाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. शहरात बिबट्याच्या संचाराची ही पहिलीच घटना आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शहरातील बालिकाश्रम रोड परिसर, पपिंग स्टेशन,बोल्हेगाव परिसरात एक बिबट्या संचार करत आहे. काही नागरिकांनी हा बिबट्या पाहिलं असल्याचं बोललं जातं आहे.
ही माहिती मिळताच पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सावध राहण्याबाबत सांगण्यात येत आहे.पोलिसांची एक व्हॅन शहरात पेट्रोलिंग करीत असून नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये, सतर्क राहून आपली काळजी घ्यावी हा संदेश नातेवाईक, मित्रांना द्यावा’, असं आवाहन करण्यात येत आहे.
आरोग्य अधिकार्यांच्या ड्रायव्हरवर बिबट्याचा हल्ला
दोन दिवसांपासून अहमदनगर शहर आणि परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शहरातील काही भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने या भागात काळजी घेण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेने केल आहे. दरम्यान गुरुवारी (ता.१७) सकाळी नगर शहराजवळ असलेल्या सोनेवाडी परिसरात बिबट्याने अहमदनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचा ड्रायव्हर किरण भुजबळ यांच्यावर हल्ला केला. किरण भुजबळ शेतीची मशागत करत असताना अचानक त्यांच्या ट्रॅटरसमोर बिबट्या आला. ट्रॅटरच्या आवाजाने बिबट्या बिथरला. बिबट्या हल्ला करणार इतयात भुजबळ यांनी प्रसंगावधान ओळखून ट्रॅटर जोरात मागे घेतला आणि तेथून पळ काढत स्वतःचा जीव वाचवला.
वनविभागाचे पथकही दाखल झाले आहे. याआधीही अहमदनगर शहरालगत असणार्या चांदबीबी महाल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं होतं. अनेकांनी चांदबीबी महाल परिसरात बिबट्या पाहिलाही होता. त्यानंतर आता नगर शहरातच बिबट्याने प्रवेश केल्याने वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे.
याबाबत व्याघ्र संरक्षण समितीचे सदस्य मंदार साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बालिकाश्रम रस्त्यावरील जुन्या पंपिंग स्टेशन रस्त्यावर उसाच्या क्षेत्रात बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन नागरिकांना झालं आहे. प्रत्यक्ष पाहणी नंतर काय होते ते होईल स्पष्ट. नागरिकांनी तसेच या भागातील रहिवाशांनी उगाच घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.
COMMENTS