याप्रकरणी उपनिरीक्षक गंगाधर दहिलकर यांनी आरोपीविरोधात कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
नागपूर । नगर सह्याद्री
आपल्या राहत्या घराला कुलुप लाऊन गेल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख असा एकुण १.९५ लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेहल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सक्करदरा पोलिस ठाण्यामध्ये घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
कल्पना हरिशचंद्र घोडे या महिलेच्या घरामध्ये चोरी झालेली आहे. त्या मेडिकलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने त्या घराला कुलुप लाऊन उमरेड मार्गावरील शिर्सी येथे कुटुंबीयांसह गेल्या होत्या. त्यानंतर आरोपीने संधी साधून घराचा पितळी कोंडा तोडला.
घराच्या वरच्या माळ्यावरील बेडरुममधील लोखंडी आलमारीतून दागिने, मोबाईल व रोख ४० हजार असा एकुण एक लाख ९५ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेहला. याप्रकरणी कल्पना यांनी सक्करदरा ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक गंगाधर दहिलकर यांनी आरोपीविरोधात कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
COMMENTS