याप्रकरणी आरोपीने आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्व:ताच्या लाभाकरीता फायदा घेतल्याचे समोर आले आहे.
गोंदिया । नगर सह्याद्री
ग्रामपंचायत वडेगाव येथील सरपंच, उपसरपंचसह दोन सदस्यांना 70 हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी कारवाई करून अटक केली आहे. आरोपी विरोधात डूग्गीपार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हे बांधकाम साहित्य पुरवठा धारक असून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत ग्रामपंचयात वडेगाव येथे सन 2020-21 मधे ग्रामपंचयात निविदेनुसार विविध कामाकरीता बांधकाम साहित्य पुरवठा करण्यात आला होता. 10 ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर बांधकाम साहित्याच्या मंजूर बिलाचे धनादेशकरीता पाच टक्के प्रमाणे मागणी करण्यात आली होती.
याप्रकरणी आरोपीने आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्व:ताच्या लाभाकरीता फायदा घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये आरोपी सरपंच रिना हेमंत तरोने (३२), उपसरपंच दिनेश सुनील मुनीश्वर (२७), ग्रामपंचायत सदस्य मार्तंड मंसाराम मेंढे (३८), ग्रामपंचायत सदस्य लोपा विजय गजभिये (५०) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS