उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका मुलीला रात्री तिच्या घरातून काही तरुणांनी पळवून नेले.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका मुलीला रात्री तिच्या घरातून काही तरुणांनी पळवून नेले. त्यांनी मुलीला शेतात आणून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मारेकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओही व्हायरल देखील केला आहे.
जौनपूमध्ये ही मुलगी आपल्या कुटुंबासह घरी झोपली होती. ६ टवाळ मुलांनी तिला शेतात पळवून आणले. तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी घटनेचा व्हिडिओही रेकॉर्ड देखील केला. मुलीने स्वत:ला सोडवण्यासाठी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला.
आपली सुटका व्हावी म्हणून तिचा आक्रोश सुरू असताना कुटुंबीयांना तिची हाक ऐकू आली. आपली मुलगी घरात नाही आणि हा तिचाच आवाज आहे हे कळताच त्यांच्या काळजात धडकी भरली. त्यांनी तातडीने शेताच्या दिशेने धाव घेतली. मुलीच्या कुटुंबीयांना पाहून नराधम तरुणांनी त्यांना शिवीगाळ करत तेथून पळ काढला. आपली बदनामी होईल त्यामुळे याबाबत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.
काही दिवसांतच तरुणाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे पीडितेच्या आईने आशिष, विकी, गोरे, प्रमोद, पप्पू आणि शेषमणी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
COMMENTS