शहजाद इमामन अन्सारी (३०), मोहम्मद सलीम इद्रिस शेख (४३) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे । नगर सह्याद्री
हडपसर परिसरामधील वैदवाडी येथील एम के एम कॅन्टीन या ठिकाणी काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॉटेलमधील दोन कर्मचारी यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहजाद इमामन अन्सारी (३०), मोहम्मद सलीम इद्रिस शेख (४३) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसरमधील 21 वर्षीय तरुणीने याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी तरुणी काम करत असलेल्या कॅन्टीनमधील कर्मचारी शहजाद इमामन अन्सारी याने हॉटेलमध्ये कोणी नसताना फिर्यादी यांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता.
दुसरा आरोपी मोहम्मद सलीम इद्रिस शेख याने वारंवार फिर्यादी यांना "मुझे भी चाहिये, मुझे भी करना है" असे बोलून तरुणीकडे शरीर सुखाची मागणी करत होत्या. त्यानंतर फिर्यादी तरुणीने पोलिसांकडे धाव घेत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
COMMENTS