तामिळनाडूतून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मदुराईमध्ये चालत्या ट्रेनमध्ये अचानक आग लागली. या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
तामिळनाडूतून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मदुराईमध्ये चालत्या ट्रेनमध्ये अचानक आग लागली. या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. २० हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक झाल्याची समोर आली आहे.
पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये ही भीषण आग लागली. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रवासी झोपेत असताना ट्रेनमध्ये अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती कि या आगीत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही. काही प्रवाशांनी ट्रेनमधून गॅस सिलिंडर नेल्याचा आरोप अन्य प्रवाशी करतायत. ट्रेनमधून सिलिंडर आणल्यानेच आग लागल्याचे दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
COMMENTS