तालुयातील जवळा गावातील एका दांम्पत्याला चार चोरट्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून त्यांचे घरातील रोख रक्कम व सोने चांदीचा ऐवज लुटून नेला होता.
३ लाख ५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त | श्रीगोंदा तालुयातुन ३ चोरटे जेरबंद
पारनेर | नगर सह्याद्री
तालुयातील जवळा गावातील एका दांम्पत्याला चार चोरट्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून त्यांचे घरातील रोख रक्कम व सोने चांदीचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पथकाने दरोडेखोरांच्या टोळीचा पारनेर पोलीसांनी पर्दाफाश केला असून श्रीगोंदा तालुयातील सुरेगाव येथील ३ चोरट्यांना पोलीसांनी केले जेरबंद केले आहे. तर दरोडेखोराकडून ३ लाख ५ हजार रूपये किंमतीचे सोने चांदीच्या दागिण्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे. चोरी प्रकरणी मिथुन उंबर्या काळे (वय २२ वर्षे, राहणार. सुरेगांव ता.श्रीगोंदा), अजय शादिश काळे (वय २२ वर्षे, रा. वाळुंज), नागेश विक्रम भोसले (वय- २० वर्षे, रा. घोसपुरी ता. नगर) यांना शिताफीने ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात वाढलेल्या चोरी, जबरी चोरी व दरोड्यांबाबत चिंता व्यक्त करून सदर दरोडेखोरांचा तपास लावण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी स्वतंत्र तपास पथक तयार आरोपींचा शोध घेण्यास सांगितले. २७ जुलै रोजी जवळा गावातील एका दांम्पत्याला चार चोरट्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून त्यांचे घरातील रोख रक्कम व सोन्याचांदीचा ऐवज लुटून नेला होता. सदर गुन्हा सुरेगाव (श्रीगोंदा) परिसरातील चोरट्यांनी केला असल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पथकास सदरची माहिती दिली. पोलिसांचे पथक मागावर असल्याची खात्री होताच चोरटे पळून जाऊ लागल्याने त्यांचा पाठलाग करून मिथुन उंबर्या काळे, आजय शादिश काळे, नागेश विक्रम भोसले यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, सहा. फौज. शिवाजी कडूस, पो.हे.कॉ. गणेश डहाळे, पो.ना. गहिणीनाथ यादव, गोरख गायकवाड, राम मोरे, पो. कॉ. सारंग वाघ, सागर धुमाळ, विवेक दळवी, मयुर तोरडमल, दिपक कैतके, संतोष शेळके, होम वैभव पांढरे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेल अ.नगर चे पो. कॉ. नितीन शिंदे, पो.कॉ. राहूल गुड्डू, मपोना. ज्योती काळे, मपोकॉ रिंकी मढेकर यांनी केली आहे.
COMMENTS