तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांचा आंदोलनचा ईशारा निघोज / पनगर सह्याद्री - निघो...
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांचा आंदोलनचा ईशारा
निघोज / पनगर सह्याद्री -
निघोज येथील कुंड रोडवरील खंडोबा पाउतके परिसरातील विद्युत जनित्र जळाल्याने निघोज परिसरातील बहुतांश भाग अंधारात असून रविवार दि . १३ रोजी विद्युत रोहित्र न बसवल्यास विद्युत सबस्टेशन कार्यालयापुढे ग्रामस्थ संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, सरपंच चित्राताई वराळ पाटील तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली धरणे आंदोलन करतील व विज वितरण कार्यालयाला कुलूप लावतील असा ईशारा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे मार्गदर्शक मंगेशशेठ लाळगे व अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांनी दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गेली तीन दिवसांपासून रोहित्र जळाले असून या परिसरातील शेकडो कुटुंबे अंधारात आहेत. या भागातील लोकांनी स्थानिक वायरमन अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे विद्युत रोहीत्राची मागणी केली. मात्र आज नाही उद्या असे करीत जनतेला हेलपाटे मारावे लागत असून भाव वाढवण्याचे काम कर्मचारी व अधिकारी करीत असतात. निघोज परिसरात मंळगंगा पतसंस्था परिसर, मशिद परिसर, आरोग्य केंद्र परिसर, खंडोबा पाउतके परिसर, ढवळे वस्ती परिसर अशा पाच ते सहा ठिकाणी जास्त क्षमतेच्या विद्युत रोहित्र बसवण्याची गरज आहे.
निघोज आणी परिसरातील विद्युत जनित्र कमी क्षमतेचे व जुने असल्याने वारंवार निघोज येथील विजग्राहकांना विज संकटाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विजमंडळाच्या कारभारावर टीकाटिप्पणी करण्यात आली . यामध्ये सरपंच चित्राताई वराळ पाटील उपसरपंच माऊली वरखडे तसेच ग्रामस्थ यांनी विज मंडळाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. यावर लवकरच विद्युत रोहित्र बसवून विज खंडीत न होण्याचे आश्वासन संबधीतांनी दिले. मात्र गेली तीन दिवसांपासून खंडोबा पाउतके परिसरातील विद्युत रोहित्र जळाले. शेकडो घर अंधारात आहे. पावसाळा असूनही कडक उन्हाळा जाणवत आहे. लोकांच्या हालअपेंष्टांमध्ये वाढ झाली आहे. असे असूनही एक विद्युत रोहीत्र बसविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी तीन दिवस नकारघंटा देत लोकांना वेठीस धरण्याचे काम करतात तर ग्रामसभेत आश्वासन देऊन पाच विद्युत रोहीत्र कधी बसवणार हा प्रश्न ग्रामस्थ गाव पदाधिकाऱ्यांना विचारीत आहेत. लोकांचा उद्रेक झाला तर काय होऊ शकते याचा अंदाज विज कर्मचारी व अधिकारी नवीन असल्याने त्यांना नाही. यासाठी खंडोबा पाउतके परिसरातील विद्युत रोहीत्र रविवार दि.१३ पर्यंत न बसल्यास सोमवार दि. १४ रोजी निघोज येथील विज कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित विद्युत रोहीत्र न बसवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे मार्गदर्शक व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे तसेच अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार व ग्रामस्थ यांनी दिला आहे.
COMMENTS