३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न कान्हूरपठार । नगर सह्याद्री - कान्हूरपठार को-आँप. क्रेडिट सोसायटी मर्यादित(मल्टी स्टेट) पतसंस्था लवकरच...
३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कान्हूरपठार । नगर सह्याद्री -
कान्हूरपठार को-आँप. क्रेडिट सोसायटी मर्यादित(मल्टी स्टेट)
पतसंस्था लवकरच ५०० कोटी ठेविचा टप्पा पूर्ण करणार असल्याचे पतसंस्थेच्या कार्यकारी संचालक नमिता ठुबे म्हणाल्या. कान्हूरपठार(ता.पारनेर) येथे संस्थेची 39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी त्या बोलत होत्या. संस्थेचे द्विंंगत कार्यकारी संचालक दिलीपराव ठुबे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेस सुरुवात झाली. त्या पुढे म्हणाल्या संस्थेने अहवाल सालात ३६९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.तसेच संस्थेची गुंतवणूक २१० कोटी रुपये, खेळते भांडवल ६१५ कोटी रुपये, एनपी ए तरतूद १८.६६ कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या चेअरमन सुशीला ठुबे म्हणाल्या की, संस्थेने आधुनिकतेची जोड धरत १७ शाखांच्या माध्यमातून कोअर बँकिंग सुविधा, एटी एम ,आर टिजीएस, एनईफटी,लाईट बिल भरणा, फास्ट टॅग रिचार्ज या सुविधा सुरू केल्याने संस्थेच्या खातेदारांची वाढ झाली आहे. तसेच सभासदांना पुढील वर्षी १२% लाभांश देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. पुणे या ठिकाणी सांगवी, किंवा हडपसर या भागात पतसंस्थेची नवीन शाखा काढण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. वर्षीक सभेमध्ये सभासद सहादू नवले, संतोष ठुबे, सखाराम ठुबे, संपत ठाणगे, धनंजय ठुबे, एस.पी ठुबे सर,विजयानंद साळवे,मार्तंड बुचुडे सर, भागा नवले,प्रशांत नवले,श्रीकांत ठुबे, सचिन गाडीलकर, गोकुळ भागवत, रंगनाथ फापाळे, ज्ञानेश्वर ठुबे,स्वप्नील संमोवंशी यांंनी विविध मुद्यावर प्रश्न उपस्थितीत केले. त्या सर्व प्रश्नांची कार्यकारी संचालक नमिता ठुबे यांनी उत्तरे दिली.
याप्रसंगी चेअरमन सुशीला ठुबे, व्हा.चेअरमन पी.के ठुबे, संचालक पोपट झावरे,सुहास शेळके, गवराम गाडगे, सुभाष नवले,राजेंद्र व्यवहारे, मंगेश गगारे, संपत खरमाळे, मधुकर साळवी, रामदास ठुबे, दादाभाऊ नवले,भास्कर ठुबे, भगवान वाळूंज, राजेंद्र रोकडे ,कार्यकारी संचालक नमिता ठुबे उपस्थितीत होत्या.
COMMENTS