पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरु करा; पद्मश्री पोपटराव पवार यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पत्र सुनील चोभे / नगर सह्...
पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरु करा; पद्मश्री पोपटराव पवार यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पत्र
सुनील चोभे / नगर सह्यादी-
यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांच्या फळबागा, पशुधन धोक्यात आले आहे. अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. परतीचा पाऊस किती होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकर्यांचे पशुधन वाचविण्यासाठी सरकारने चारा डेपो सुरु करावेत. तसेच दुष्काळी भागातील फळबागा जगविण्याच्यादृष्टीने नियोजन करावेत अशा मागणीचे पत्र आदर्श संकल्प आणि प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष, पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविले आहे.
यंदा राज्याचा काही भाग वगळता इतर ठिकाणी पुरेसा पाऊस पडलेला नाही. परतीचा मान्सून किती पडेल आणि तो पुरेसा पडेल याची शयता नाही. तरी शेतकन्यांचे पशुधन वाचविण्याचे दृष्टीने तातडीने चाराडेपोचे नियोजन करण्यात यावे. अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात लम्पी आजाराने डोके वर काढल्यामुळे चारा छावणी सुरु करणे शय नाही. चारा डेपोचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
ज्या भागात धरणाचे पाणी आहे त्याठिकाणी तसेच कृषी विद्यापीठ व कृषी महामंडळे यांच्या क्षेत्रावर चारापिकाचे नियोजन करण्यात यावे.
मागील ३ वर्षात सरासरी किंवा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे फळबागा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. तरी दुष्काळी भागातील फळबागा जगविण्याच्या दृष्टीने राज्यस्तरांवरून योग्य ते नियोजन करण्यात यावे, अशी विनंती पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
COMMENTS