मुंबई | नगर सहयाद्री बॉलिवूड आणि उद्योजकांचं नातं तसं फार जुनं आहे. सध्या हेच कनेक्शन असणारं नातं सगळीकडे चर्चेत आहे. तो म्हणजे तरूण उद्योज...
मुंबई | नगर सहयाद्री
बॉलिवूड आणि उद्योजकांचं नातं तसं फार जुनं आहे. सध्या हेच कनेक्शन असणारं नातं सगळीकडे चर्चेत आहे. तो म्हणजे तरूण उद्योजक निखिल कामथ आणि बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती. या आधी निखिल मिस वर्ल्ड २०१७ आणि लोकप्रिय अभिनेत्री मानुषी छिल्लरला डेट करत होता.
नुकतेच निखिलने मानुषीबरोबरच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे. इंस्टाग्रामवरदेखील या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तर, मिळालेल्या माहितीनुसार, निखिल कामथ सध्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत आहे अशा चर्चांना उधाण आलं आहे. निखिल कामथ हा मूळचा कोकणी ब्राह्मण कुटुंबातील असून त्याचा जन्म कर्नाटकात ५ सप्टेंबर १९८५ रोजी झाला.
अभ्यासात रस नसल्यामुळे दहावी पूर्ण होण्यापूर्वीच निखिलने शाळा सोडली. निखिलने महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले नाही. त्यामुळे त्याच्याकडे कोणतीही औपचारिक पदवी नाही. निखिलला नेहमीच बिझनेसमॅन व्हायचे होते. केवळ १४ वर्षांचा असताना निखिलने मोबाईल फोनच्या क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. निखिलचा भाऊ नितीन कामथ हा देखील बिझनेसमॅन असून तो निखिलच्या व्यवसायात भागीदार आहे.
COMMENTS