अहमदनगर | नगर सह्याद्री दुकान चालविण्यासाठी दर महिन्याला १० हजार रूपये द्यावे लागतील, असे म्हणून व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समो...
अहमदनगर | नगर सह्याद्री
दुकान चालविण्यासाठी दर महिन्याला १० हजार रूपये द्यावे लागतील, असे म्हणून व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्यावसायिक हितेश नारायण रोहीन (वय ३० रा. माणिक चौक) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून करण कृष्णा फसले (रा. माणिक चौक) विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
रोहीन यांचे ख्रिस्तगल्ली येथे महादेव नॉवेल्टी नावाचे कॉस्मेटिक दुकान आहे. ते ४ ऑगस्टला सायंकाळी दुकानावर असताना फसले तेथे आला. रोहीन यांना तो म्हणाला, तु माझ्यावर केलेली तक्रार मागे घे, नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. त्यावर रोहीन यांनी त्याला नंतर पाहू असे उत्तर दिले. त्यावर तो म्हणाला, तुला जर येथे दुकान चालवायचे असेल तर तू मला महिन्याला १० हजार रूपये दे’, रोहीन यांनी त्याला नकार दिला असता त्याने लाकडी दांडयाने काच फोडून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर १७ ऑगस्टला रात्री १० च्या सुमारास तो पुन्हा दुकानात आला व त्याने १० हजार रूपये दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून धमकी दिली. रोहीन यांनी फिर्याद दिली आहे.
COMMENTS