वसई वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. यानंतर पोलिसांनी ९ गुन्ह्यांची उकल केली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
वसईमधुन एक बातमी समोर आली आहे. सराईत वाहनचोरी आणि घरफोडी करणाऱ्या ४ चोरट्यांना जेरबंद करण्यात वसई वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. यानंतर पोलिसांनी ९ गुन्ह्यांची उकल केली आहे.
दुचाकी चोरीची फिर्याद वसई वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करत असताना एका गुप्त खबरदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून चार सराईत चोरट्यांना अटक केली. या संशयितांविरुद्ध चोरी, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्हेगारांकडून ९ गुन्ह्यांची उकल करण्यात वसई वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून चोरीचा लॅपटॉप, दुचाकी, साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
COMMENTS