याप्रकरणी अमर अप्पासाहेब भुसारे (२३) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पुणे । नगर सह्याद्री
उसने घेतलेले पैसे वारंवार मागणी करून देखील परत दिले नाहीत, शिवाय पैसे देणाऱ्या तरुणाला मानसिक त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी सकाळच्या दरम्यान या तरुणाने राहत्या घरामध्ये (महादेवनगर कॉलनी, चक्रपाणी वसाहत रोड) गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी अमर अप्पासाहेब भुसारे (२३) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शिवम बनवारी दास, सतीश ननावरे-पाटील या दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसनपूर्वी सागर भुसारे याच्याकडून आरोपींनी पैसे घेतले होते. सागर याने वारंवार आरोपींकडे पैशाची मागणी केली. परंतु आरोपीकडून पैसे परत न करता सागरला मानसिक त्रास देण्यास सुरवात झाली. या त्रासाला कंटाळल्यामुळे सागरने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
COMMENTS