खा. विखेंच्या प्रयत्नातून रस्ते डांबरीकरण कामास प्रारंभ; नगरसेवक महेंद्र गंधे संगम चौक ते तख्तीदरवाजा रस्ता डांबरीकरणार सुरुवात अहमदनगर | ...
खा. विखेंच्या प्रयत्नातून रस्ते डांबरीकरण कामास प्रारंभ; नगरसेवक महेंद्र गंधे
संगम चौक ते तख्तीदरवाजा रस्ता डांबरीकरणार सुरुवात
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरातील गंजबाजार परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डेपडले आहेत. हीशहराची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे यापरिसरामध्ये जिल्हाभरातील ग्राहक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शहराची बदनामी जिल्हाभर होत आहेफ खा.सुजय विखे पाटीलयांच्या प्रयत्नातून संगम चौक, ह्यूममेमोरियल चर्च ते तख्ती दरवाजा पर्यंत रस्ताडांबरीकरण कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे असे प्रतिपादन नगरसेवक महेंद्र भैय्या गंधे यांनी केले.
खा.डॉ.सुजय विखे पाटीलयांच्या प्रयत्नातून संगम चौक, ह्यूममेमोरियल चर्च ते तख्तीदरवाजा पर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक महेंद्र भैय्यागंधे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळीजैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुनील रामदासी, नगरसेविका मंगल लोखंडे, वसंत लोढा, सुरेंद्र गांधी, किशोर बोरा, रखमाजी निस्ताने, अमोल निस्ताने आदींसह नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की, जुन्या गावातील रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध होऊन देखीलया कामांना विविध अडचणीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यारस्त्याचे कामे पूर्ण झाल ेनाही पण आता खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित रस्त्यांची कामेहीमंजूर असून ती लवकरच पूर्ण होतील असे ते म्हणाले.
COMMENTS