सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. रोहित, प्रशांत आणि ऋत्विक अशी अटक आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नालसाब मुल्ला याच्या हत्येवेळी तिन्ही संशयित घटनास्थळी हजर होते. या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे सध्या कळंबा कारागृहात असून पोलिसांनी त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नालसाब मुल्ला यांचे घर शंभर फूट रोडवरील बाबा चौकात आहे. शनिवारी ते वाचनालयाजवळ थांबले होते त्यानंतर अंधारात गाडीवरून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.
या हल्ल्यात नालसाब मुल्ला यांच्या छातीत आणि पोटात गोळी झाडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. एलसीबी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सनी, विशाल आणि स्वप्नील यांची कसून चौकशी केली असता त्यांच्यासोबत आणखी तीन जण असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने रोहित, प्रशांत आणि ऋत्विक या तिघांना अटक करण्यात आली.
नालसाब मुल्ला खून प्रकरणी एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गोळ्या झाडण्यासाठी वापरलेली पिस्तूले जतमधून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासासाठी पोलिसांचे पथक जतला रवाना करण्यात आले आहे.
COMMENTS